ई-सेवा केंद्र संचालकास अटक

By Admin | Updated: October 29, 2015 02:48 IST2015-10-29T02:48:31+5:302015-10-29T02:48:31+5:30

भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बांगलादेशी तरुणांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या तालुक्यातील वेणी खुर्द येथील महा-ईसेवा केंद्राच्या संचालकासह ...

E-service center operator arrested | ई-सेवा केंद्र संचालकास अटक

ई-सेवा केंद्र संचालकास अटक

बांगलादेशीचे प्रकरण : अर्जनवीसही ताब्यात
पुसद : भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बांगलादेशी तरुणांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या तालुक्यातील वेणी खुर्द येथील महा-ईसेवा केंद्राच्या संचालकासह अर्जनविसाला पुसद पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे दोन बांगलादेशी तरुणही पुसद पोलिसांच्या ताब्यात आहे. यात २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
हनुमंता कोंडबाराव आऱ्हाडे (२९) असे महा-ईसेवा केंद्र चालकाचे तर किशोर किसन भगत (४१) दोघे रा. वेणी खुर्द असे अटकेत असलेल्या अर्जनविसाचे नाव आहे. वेणी खुर्द येथील महा-ईसेवा केंद्रातून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर भारतीयत्व सिद्ध करणारे बांगलादेशी तरुण मोहंमद आजीम गाजी व हबीब ऊर्फ हबील शेख या दोघांना पुसद ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. या दोघांसाठी याच महा-ईसेवा केंद्रातून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तहसील कार्यालयाच्यावतीने पोलिसात तक्रार दिली. बांगलादेशी तरुणांना अटक केल्यानंतर बुधवारी महा-ईसेवा केंद्राचा संचालक आणि अर्जनविसालाही पोलिसांनी अटक केली. आता मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: E-service center operator arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.