नगरपरिषद शाळेत ई-लर्निंग करणार
By Admin | Updated: September 8, 2015 04:34 IST2015-09-08T04:34:34+5:302015-09-08T04:34:34+5:30
शिक्षणाच्या कक्षा रुंदावलेल्या आहे. मुलांना हसत-खेळत शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या सत्रापासून

नगरपरिषद शाळेत ई-लर्निंग करणार
आर्णी : शिक्षणाच्या कक्षा रुंदावलेल्या आहे. मुलांना हसत-खेळत शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या सत्रापासून नगरपरिषदेच्या शाळांमधून ई-लर्निंग सुरू करणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष आरीज बेग यांनी दिली.
नगरपरिषदेतर्फे शहरातील निवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी नगराध्यक्ष हे बोलत होते. हा कार्यक्रम गांधीनगरच्या शाळेमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आरीज बेग होते. उपनगराध्यक्ष नीता ठाकरे, तहसीलदार सुधीर पवार, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, प्रशासन अधिकारी मधुकर ठाकरे, खुशाल ठाकरे प्रमुख पाहुणे होते.
गजानन घोडेराव, अर्जुन काटपल्लीवार, इंदुताई दहीफळे, प्रमिला पाटील, सुभाष निलावार, ना.ना. काळे, ज्योत्स्ना लोळभे, नईमुद्दीन शेख, सुनिता बेलगमवार, पद्माकर लोणसने, शारदा काळे, शिवरामवार, खडसिंगे, उपलेंचवार आदी शिक्षक, शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पु.ल. झापे यांनी केले. तर आभार मधुकर ठाकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)