शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८८ लाख हेक्टरची ई-पीक नोंदणी बाकी; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:46 IST

Yavatmal : प्रत्यक्ष शेतात पोहोचल्यावर संदेश मिळतो, तुम्ही कार्य क्षेत्राबाहेर आहात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माझी शेती माझा सातबारा मी नोंदविणार पिकांचा पेरा, या ब्रीदवाक्याला धरून राज्य शासनाने ई-पीक नोंदणी बंधनकारक केली. यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. प्रत्यक्षात या कालावधीत राज्यभरात ४७ टक्के एवढीच ई-पीक नोंदणी झाली. नोंदणी प्रक्रियेत वारंवार तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे राज्यातील ८८ लाख हेक्टर क्षेत्र नोंदणी प्रक्रियेपासून दूर आहेत. यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख कार्यालयाने ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत वाढविल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया राबविताना व्हर्जन थ्री हे सुधारित सॉफ्टवेअर अमलात आणले आहे. यामध्ये शेतशिवारात पोहचल्यानंतरच पिकांची नोंद घेतली जाणार आहे. अक्षांश-रेखांश याचा मेळ होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेतकरी स्वतःच्या शेतात पोहचल्यानंतर ही अक्षांश-रेखांश दाखवित नाही. यामुळे शेती पिकांच्या नोंदीच घेतल्या जात नाही. तुम्ही कार्य क्षेत्राबाहेर आहत, असा संदेश मिळतो. त्यामुळे निम्मे शेतकरी अडचणीत आले आहेत. काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना ई-पिकाची नोंद करता आली नाही. 

४९ हजार सहायक पोहोचणार मदतीला

शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी मुदत संपल्यानंतर राहिलेल्या पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी सहायकांवर जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी ४९ हजार ३६६ सहायकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीत मोलाचा हातभार लागणार आहे.

केवळ ८१ लाख हेक्टरवरच्या नोंदी

राज्यात पेरणीयोग्य क्षेत्र १ कोटी ६९ लाख हेक्टरचे आहे. यापैकी ई-पीक पाहणी प्रयोगात ८१ लाख ४ हजार हेक्टरच्या नोंदी झाल्या. तर ८८ लाख हेक्टरच्या नोंदी अजून बाकी आहेत. एकूण क्षेत्राच्या ४७ टक्के क्षेत्रावर ह्या नोंदी झाल्या आहेत. अजून ५३ टक्के क्षेत्रावरील नोंदी बाकी आहेत. 

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती