सासऱ्याच्या घरी जावयाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: June 23, 2016 01:59 IST2016-06-23T01:59:31+5:302016-06-23T01:59:31+5:30
सासऱ्याच्या घरी जावयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिग्रस तालुक्यातील काटी येथे मंगळवारी रात्री घडली. खून

सासऱ्याच्या घरी जावयाचा संशयास्पद मृत्यू
दिग्रस : सासऱ्याच्या घरी जावयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिग्रस तालुक्यातील काटी येथे मंगळवारी रात्री घडली. खून की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला असून दिग्रस पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
गजानन श्रीराम भगत (४०) रा. काटी असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांनी दिग्रसच्या रुग्णालयात उपचारार्थ आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. बुधवारी गजाननची आई ताराबाई व आत्या दिग्रस ठाण्यात पोहोचल्या. त्याच्या सासरकडील मंडळींनी त्याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले. त्याच दरम्यान गजाननची पत्नी बबीता ठाण्यात आली. तिने आपल्या पतीचा मृत्यू कशाने झाला याची कल्पना नसल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे पोलीस संभ्रमात सापडले असून शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले. तर मृत गजाननच्या घरी काही चिठ्ठ्या सापडल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)