शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:30 PM

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.

ठळक मुद्देसहा तालुक्यात अतिवृष्टी : हजार घरांची पडझड, आर्णी, दिग्रसला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.तर जिल्ह्यात बाजीराव डेरे रा. धानोरा आणि अंकुश साबळे रा. सुकळी या दोघांचा बुडून मृत्यू झाला.दिग्रस तालुक्यात सर्वाधिक १३४, आर्णी १२७, दारव्हा ९२, पुसद १०६, उमरखेड ८६, महागाव ८३ मिमी पावसाची नोंद झाली. दिग्रसमध्ये पुरात अडकलेल्या ३०० प्रवाशांना प्रशासनाने तहसील कार्यालयात निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ९३७ घरांची पडझड झाली आहे. त्यात उमरखेड १००, महागाव २५१, दिग्रस ४००, पांढरकवडा ७३, पुसद ८४, यवतमाळ २३, घाटंजी तालुक्यात सहा घरे पडली. दरम्यान पुरामुळे दिग्रसमध्ये २२, यवतमाळ एक तर पुसद तालुक्यात सहा अशी २९ जनावरे वाहून गेली. तर दारव्हा तालुक्यात मात्र तब्बल १९४ जनावरांचा मृत्यू झाला.सुरुवातीला पिकांना संजीवनी देणारा पाऊस शुक्रवारी पिकांचा कर्दनकाळ ठरला. जवळपास तीन हजार हेक्टरवरील शेत पिके वाहून गेली. यात घाटंजी तालुक्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, पांढरकवडा ३५९, पुसद ७९४ तर दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरवर नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचा जलसाठा वाढला आहे. बेंबळा ५०.७१, निम्न वर्धा २६.५२, अधरपूस ८२.५२, अरुणावती ७७.२३, अपर पैनगंगा ३८.१५, अडाण प्रकल्प ८६.३७ टक्के भरला आहे. अडाण प्रकल्पाचे पाच आणि अधर पूस प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर