मुस्लीम आरक्षणासाठी धरणे
By Admin | Updated: January 24, 2015 01:55 IST2015-01-24T01:55:23+5:302015-01-24T01:55:23+5:30
जमीयत उल्मा-ए-हिंद या संघटनेच्यावतीने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

मुस्लीम आरक्षणासाठी धरणे
पुसद : जमीयत उल्मा-ए-हिंद या संघटनेच्यावतीने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
मुस्लिम समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून, याबाबतचा अहवाल न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा समिती व मेहमूद रहेमान समितीने शासनाला दिला आहे. त्यामुळे शासनाकडून मुस्लीम समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे. परंतु शासन मात्र मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शिक्षणासह नोकरीमध्ये मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी मौलाना समद, डॉ. रेहान, साकेब शहा, हजीज अकील, सैय्यद इस्माईल, शेख मुजीब, डॉ. मोहंमद जुबेर, डॉ. इरशाद, आसद अयाकिब, अब्दुल खलीद, सैय्यद इफ्तेखार अली, शेख सादीक, अमजद खान, इम्रान खान, शेख रऊफ शेख शाबीर, शेख याकुब, जावेद खान, शेख कादर, एजाज मिया, शेख इस्माईल, शेख महेफूस, निसार शेख, इस्त्याक शेख, सैय्यद, शेख अमन, मोहंमद इक्बाल, मोहंमद आमीर, शेख जमीर, शेख वसीम, शेख कय्युम, डॉ. मोहंमद नदीम, शेख अल्ताफ, फिरोज खान, मुफ्ती जावेद कासमी, हाफीज मोहसीन अमानी, तनवीर खान, मोहंमद वकार आदींसह असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)