सदोष बियाण्यांमुळे भुईमूगाला फटका
By Admin | Updated: May 28, 2017 00:53 IST2017-05-28T00:53:06+5:302017-05-28T00:53:06+5:30
सदोष बियाण्यांमुळे भूईमूगाच्या पिकाला फटका बसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

सदोष बियाण्यांमुळे भुईमूगाला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : सदोष बियाण्यांमुळे भूईमूगाच्या पिकाला फटका बसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूगाची लागवड केली. मात्र बियाण्यात भेसळ असल्याने आता बहुतांश झाडांना केवळ एक ते दोनच शेंगा लागल्याचे आढळून आले. यामुळे तालुकयातील शेतकरी हवालदिल झाले. याबाबत त्यांनी इंद्रनिल नाईक यांच्याकडे तक्रार केली. नाईक यांनी वालतूर तांबडे, नाईकनगर व बान्सी येथील शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. या पाहणीत तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.