दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विक्रीत मोठी वाढ

By Admin | Updated: February 1, 2015 23:05 IST2015-02-01T23:05:50+5:302015-02-01T23:05:50+5:30

महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय

Due to drought situation, there is huge increase in livestock sales | दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विक्रीत मोठी वाढ

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विक्रीत मोठी वाढ

मोहदी : महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय करण्याची अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु महागाव तालुक्यात कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे.
जगण्याचे मुख्य साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाकडे आजही ग्रामीण भागातील जनतेने दुर्लक्ष केले नाही. शेती बरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र चालावे म्हणून पशुपालनावर भर देण्यात आला आहे. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पशुपालन हा व्यवसाय राबविल्या जात असलेल्या अनेक योजना या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेती व्यवसायात सातत्याने विशिष्ट बदल झालेले दिसत आहे. अयोग्य नियोजन निसर्गाने न दिलेली साथ व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्यामुळे आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्या अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही.
ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनांबद्दलची माहिती मिळते व बऱ्याच लोकांना योजनाच माहिती नाही. अशा शासनाच्या योजनेचा उपयो करून घेऊन आपल्या आर्थिक चक्राची घडी बसवून विकास करणे गरजेचे आहे. शासनाने पशुपालनासाठी महत्त्वपूर्ण अशा योजना राबविल्या आहेत. मात्र या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आजही पोहोचलेल्याच नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने या तालुक्यातील आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे.
तेव्हा या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कार्यक्रम घ्यावे तसेच जनजागृती करून ग्रामीण नागरिकांना जनावरविषयी योग्य माहिती पोहोचविणेही गरजेचे आहे. यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. याविषयी योग्य उपाय योजना कराव्या, अशी मागणी जनता करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to drought situation, there is huge increase in livestock sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.