किरकोळ कारणावरून वाद, दारूच्या नशेत पतीने आवळला पत्नीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 03:43 PM2022-07-15T15:43:58+5:302022-07-15T15:46:52+5:30

वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Drunk | किरकोळ कारणावरून वाद, दारूच्या नशेत पतीने आवळला पत्नीचा गळा

किरकोळ कारणावरून वाद, दारूच्या नशेत पतीने आवळला पत्नीचा गळा

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

पुसद (यवतमाळ) : घरातील क्षुल्लक कारणावरून पतीने दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

रूबीना मुख्तार खान (वय २८, रा. मोबीनपुरा) असे मृत पत्नीचे नाव आहे. वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोबीनपुरा येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून बुधवारी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पतीला वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत रूबीना मुख्तार खान आणि पती मुक्तार खान सत्तार खान पठाण (३२) यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार दारूच्या आहारी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. रुबीना व मुख्तारमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद निर्माण होत होता. बुधवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा काहीतरी कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या मुख्तारने गळा आवळून पत्नीचा खून केला. आरोपीला वसंतनगर पोलिसांनी अटक केली असून, रुबीनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेने मोबीनपुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भावाने दिली पोलिसांत तक्रार

गुरुवारी रुबीनाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. नंतर रुबीनाचा खून केल्याप्रकरणी तिचा भाऊ शेख सद्दाम शेख गफार (३५, रा. सुकळी, ता. उमरखेड) यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास वसंतनगरचे पोलीस करीत आहेत.

Read in English

Web Title: Drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.