चालकाच्या प्रसंगावधानाने एसटीतील प्रवाशांचे प्राण वाचले
By Admin | Updated: October 20, 2016 01:33 IST2016-10-20T01:33:57+5:302016-10-20T01:33:57+5:30
अचानक बोलेरो जीप एसटी बसच्या समोर आल्याने होणारा भीषण अपघात टाळण्यासाठी एसटी चालकाने प्रसंगावधान राखून

चालकाच्या प्रसंगावधानाने एसटीतील प्रवाशांचे प्राण वाचले
यवतमाळ : अचानक बोलेरो जीप एसटी बसच्या समोर आल्याने होणारा भीषण अपघात टाळण्यासाठी एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस चक्क रस्त्याच्या खाली उतरविली. मात्र बोलेरोने एसटी बसला धडक दिली. त्यात बस व बोलेरोतील प्रवासी जखमी झाले. ही घटना पांढरकवडा मार्गावरील जोडमोहानजीक घडली.
जोडमोहाजवळी खटेश्वर देवस्थान येथून दर्शन घेऊन बोलेरो जीप यवतमाळकडे येत होती. त्याचवेळी एका एसटी बसला जबर धडक बसली. चालकाने प्रसंगावधान राखून बस सरळ रस्त्याच्या खाली उतरविली. त्यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले. अपघातात जीपचाही चुराडा झाला आहे. (प्रतिनिधी)