शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक पुलाखाली काेसळला; चालक ठार, वाहकाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 18:14 IST

टीनपत्रे घेऊन जात असलेला भरधाव ट्रक अचानक पुलाखाली कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता.

ठळक मुद्देआर्णी मार्गावरील वाघाडीजवळची घटना

यवतमाळ : हिवरी येथील आर्णी मार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजता नांदेडकडे टीनपत्रे घेवून जात असलेला ट्रक अचानक पुलाच्या खाली कोसळला. हा भीषण अपघात पाहून अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहिले. ट्रकची कॅबिन पूर्णत: नाल्यात गाडल्या गेली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता.

ज्ञानेश्वर तुकाराम कोपनर (२४) रा. हुलेवाडी, ता. लोही, जि. नांदेड असे मृत चालकाचे नाव आहे. तर उमेश विलास किडे (२०) रा. चिखल भोसी ता. कंधार जि. नांदेड असे जखमी वाहकाचे नाव आहे.

आज सकाळी एमएच२०-६८१४ क्रमांकाचा ट्रक नागपूरवरून नांदेडकडे टीनपत्रे घेवून जात होता. दरम्यान अचानक हा ट्रक वाघाडी पुलावरून खाली कोसळला. भल्या पहाटे हा अपघात झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. क्रेन आणल्याशिवाय त्यातील जखमी व मृताला बाहेर काढता आले नाही. अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.

जखमी उमेशचे दोन्ही पाय शरीरावेगळे झाले आहे. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून नागपूर येथे हलविण्यात आले. काही तासांच्या शोधकार्यानंतर चालक ज्ञानेश्वरचा मृतदेह हाती लागला. वाहक उमेशचे दोन्ही पायसुद्धा तेव्हाच मिळाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू