जीप अपघातात चालक ठार
By Admin | Updated: October 27, 2015 02:47 IST2015-10-27T02:47:13+5:302015-10-27T02:47:13+5:30
भरधाव बोलेरो जीप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही

जीप अपघातात चालक ठार
पुसद : भरधाव बोलेरो जीप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही घटना पुसद-वाशिम मार्गावरील मारवाडी घाटात सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
आकाश बालचंद्र पट्टे (२२) रा. सोनारगल्ली मेहकर असे मृताचे नाव आहे. आकाश आपल्या मालकीची बोलेरो जीप एम.एच.२८-एबी-२८६० मध्ये भाजीपाला घेऊन मेहकरवरून उमरखेडकडे जात होता. त्यावेळी मारवाडी घाटात चालकाचे नियंत्रण गेल्याने बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात आकाश जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मारवाडीचे पोलीस पाटील वामन राठोड यांनी खंडाळा पोलिसांना दिली. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)