शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सपनाच्या खुनाचा तपास ठरला उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:43 IST

घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव केला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘सीआयडी’ची मोहर : पोलीस अधिकाऱ्यांचा १० सप्टेंबरला पुण्यात गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव केला जाणार आहे.सपना पळसकरच्या खुनाचा तपास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंह भिकमसिंह बायस यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सहायक फौजदार अकील देशमुख, जमादार अरुण नाकतोडे, गजानन अजमिरे व पोलीस शिपाई आशिष भुुसारी यांनी केला होता. या सर्वांचा आता १० सप्टेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे मुख्यालयात पोलीस महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला जाणार आहे.२४ आॅक्टोबर २०१२ ला सायंकाळी घराच्या आवारात (चोरंबा ता. घाटंजी) खेळत असताना अचानक सपना पळसकर गायब झाली. ती हरविल्याची तक्रार दुसºया दिवशी घाटंजी पोलिसात नोंदविली गेली. प्रकरण गाजल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला गेला होता. पोलीस निरीक्षक चंदनसिंह बायस व चमूने आपले कसब पणाला लावून व गावात साध्या वेशात मुक्कामी राहून हा गुन्हा उघडकीस आणला. नरबळीसाठी जवळच्या नातेवाईकांनीच सपनाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सपनाच्या आजी (आईची आत्या), मामा, आजोबा अशा आठ जणांना आरोपी बनविण्यात आले. या तपासात डीएनए टेस्ट करण्यात आली होती. हा खटला यवतमाळच्या सत्र न्यायालयात चालला. या शिक्षेला आता नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या तपासाची सीआयडीने दखल घेतल्याने जिल्हा पोलीस दलात समाधान व्यक्त होत आहे.नातेवाईकच फितूर !मृतक सपनाचे रक्ताचे नातेवाईकच न्यायालयात फितूर झाले. मात्र डीएनए रिपोर्टवरून तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला.पाच आरोपींना फाशीआठ पैकी एका आरोपीचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला. उर्वरित सात आरोपींपैकी पाच जणांना फाशी तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस