नाट्यप्रयोगाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

By Admin | Updated: April 14, 2016 02:08 IST2016-04-14T02:08:20+5:302016-04-14T02:08:20+5:30

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात सहाव्या दिवशी

Dramatanana listeners are spellbound | नाट्यप्रयोगाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

नाट्यप्रयोगाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

उत्स्फूर्त प्रतिसाद : धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील सहावे पुष्प
पुसद : महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात सहाव्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहिलेले व नंदू माधव दिग्दर्शित ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग मंगळवारी सादर करण्यात आला. पुसदकरांनी या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यशवंत रंग मंदिरात झालेल्या या नाटकाला डॉ.वजाहत मिर्झा, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार इंगोले, महेश खडसे, डॉ.मोहमद नदीम, सुभाष कांबळे, जयंत पाटील, प्रमोद सोनटक्के, संजय कांबळे, हेमंत मेश्राम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे यांनी नाटकाच्या आयोजनामागील समितीची भूमिका मांडली. या नाटकातून शिवाजी महाराजांचा इतिहास रसिकांपुढे उलगडून दाखविण्यात आला. शिवाजी महाराजांची धार्मिक सहिष्णुता, स्त्रीविषयक असलेले उच्च विचार, शेतीविषयक भूमिका, जातपातविरहीत राजकीय नीती या बाबींवर या प्रयोगात प्रकाश टाकण्यात आला आहे.
२५ फुटांच्या मोठ्या एलईडी स्क्रिनवर नाटक पाहण्याचा आनंद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश वाढवे, शीतलकुमार वानखडे, विठ्ठल खडसे, प्रभाकर गवारगुरू, मिलिंद हटेकर, मनोज खिराडे, गणेश वाढोरे, प्रा.विक्रांत मेश्राम आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dramatanana listeners are spellbound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.