पांढरकवडाचे आगार प्रभारावरच

By Admin | Updated: June 11, 2017 00:26 IST2017-06-11T00:26:30+5:302017-06-11T00:26:30+5:30

येथील एस.टी.आगारातील आगार प्रमुखाचा पदभार गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारावर असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

The door of the pavement is in charge only | पांढरकवडाचे आगार प्रभारावरच

पांढरकवडाचे आगार प्रभारावरच

प्रवाशांना मनस्ताप : रात्रीच्यावेळी आगारात चालतो जुगार
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील एस.टी.आगारातील आगार प्रमुखाचा पदभार गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारावर असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी या आगारात जुगारही भरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
येथील आगारात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच आता येथील आगार प्रमुखाचा प्रभार यवतमाळ येथील आगार प्रमुखांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ते आठवड्यातून दोन-तीनदाच या आगारात येत असतात. त्यामुळे त्यांचा कोणत्याही कर्मचाऱ्यांवर वचक नसून मानमानी पद्धतीने वेळापत्रकानुसार वाहन न सोडणे आदी प्रकार या आगारात सुरू आहे.
आगाराच्या प्रवेशद्वारासमोरच पाण्याचे मोठे डबके साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. या चिखलात आता शहरातील मोकाट कुत्रे व जनावरेही लोळताना आढळून येते. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी या आगारात काही युवक जुगार खेळत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या परिसरात एखादा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.
आता शाळा, महाविद्यालयांना सुरूवात होणार असून अनेक विद्यार्थिनी बसचा पास काढून अपडाऊन करीत असतात. मात्र या परिसरात मजनुंचाही वावर अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी बसस्थानक परिसरात अनेक मजनुंना नागरिकांनी चोपसुद्धा दिला होता. त्यामुळे विद्यार्थिनींना बसस्थानकातच असुरक्षित वाटू लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन येथे कायमस्वरूपी आगार प्रमुखाची नियुक्ती करावी व आगाराचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The door of the pavement is in charge only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.