डोंबिवलीच्या घटनेचा पुसदमध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:45 AM2021-09-25T04:45:50+5:302021-09-25T04:45:50+5:30

पुसद : डोंबिवली येथे १४ वर्षीय चिमुरडीवर ३० नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने ...

Dombivli incident protested in Pusad | डोंबिवलीच्या घटनेचा पुसदमध्ये निषेध

डोंबिवलीच्या घटनेचा पुसदमध्ये निषेध

Next

पुसद : डोंबिवली येथे १४ वर्षीय चिमुरडीवर ३० नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने शुक्रवारी एसडीओंमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

डोंबिवलीमध्ये ३० नराधमांनी चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला. गेल्या काही दिवसांत महिला, मुलींवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलून त्या ३० नराधमांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रूपाली जयस्वाल, उपाध्यक्ष रेश्मा लोखंडे तसेच ओबीसींच्या वतीने जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शेखर वानखेडे, उपाध्यक्ष लक्ष्मण आगाशे, विनोद जिलेवार, डॉ. आरती फुपाटे, महेश नाईक, दीपक परिहार, राजेंद्र महाजन, रमेश सोमाणी, धनंजय अत्रे, नारायण पुलाते, गोविंद कुकडे, संतोष मुकेश व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dombivli incident protested in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app