डोल्हारी पाणीपुरवठा योजनेला मान्यता

By Admin | Updated: May 14, 2015 02:25 IST2015-05-14T02:25:23+5:302015-05-14T02:25:23+5:30

दारव्हा तालुक्याच्या डोल्हारी (शेंद्री) येथे पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Dolhari Water Supply Scheme | डोल्हारी पाणीपुरवठा योजनेला मान्यता

डोल्हारी पाणीपुरवठा योजनेला मान्यता

यवतमाळ : दारव्हा तालुक्याच्या डोल्हारी (शेंद्री) येथे पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३३ लाख ३४ हजार १७२ एवढा खर्च या योजनेसाठी अपेक्षित आहे. ११ मे रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सदर योजनेचे काम हाती घेतले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २० फेब्रुवारी २०१४ रोजी या योजनेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली. मात्र योजनेचा दरडोई खर्च जिल्हा परिषदेच्या विहित निकषापेक्षा जास्त असल्याने मंजूरीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.
या योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत/ग्राम पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीला करावी लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर किमान एक वर्ष ही योजना चालविणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. कुठल्याही कारणाने योजनेच्या खर्चात वाढ झाल्यास वाढीव खर्चापोटी शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
योजना चालविणे, देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी प्रती कुटुंब वार्षिक ६५० रुपये पाणीपट्टी निश्चित करावी आणि कालपरत्वे त्यात वाढ करावी, असेही सूचविण्यात आले आहे. योजना चालविण्यासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी कुठलेही अनुदान दिले जाणार नाही, योजनेत १०० टक्के घरगुती नळ जोडण्यांचा समावेश करावा, असेही या योजनेला मान्यता देताना सुचविण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Dolhari Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.