बंदीभागातील जेवली झाले डॉक्टरांचे गाव

By Admin | Updated: July 20, 2015 02:25 IST2015-07-20T02:25:11+5:302015-07-20T02:25:11+5:30

उमरखेड तालुक्यातील बंदीभागात मोडणारी गावे शासकीय औदासीन्याची अवकळा भोगणारीच. पण, दुर्गम वातावरणच अनेकांना जिद्दीची शिदोरी देते.

The doctor's village was jockeyed in prison | बंदीभागातील जेवली झाले डॉक्टरांचे गाव

बंदीभागातील जेवली झाले डॉक्टरांचे गाव

लोकमत विशेष
पुंजाराम हटकरे जेवली
उमरखेड तालुक्यातील बंदीभागात मोडणारी गावे शासकीय औदासीन्याची अवकळा भोगणारीच. पण, दुर्गम वातावरणच अनेकांना जिद्दीची शिदोरी देते. अशाच जिद्दीची एक अनोखी कहाणी जेवली नावाच्या लहानशा खेड्यात घडली. जिल्हा मुख्यालयापासून लांब आणि जेमतेम सुविधा असलेल्या या खेड्यातून तब्बल ११ विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत.
जेवली गाव चार हजार लोकसंख्येचे. येथे शिक्षणाची सुविधाच नव्हती. १९९१ मध्ये राजाराम बापू विद्यालयाच्या रूपाने कशीबशी दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली. अशा परिस्थितीत जेवलीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाणे महाकठीण होते. पण जे कुणीही करत नाही, तेच आपण करायचे, असा काहींचा प्रण असतो. जेवलीतील ११ विद्यार्थ्यांनी हेच दुर्लभ ध्येय उराशी बाळगले. अमोल वसंतराव देवसरकर , सुरज बालसिंग पडवाले, देवानंद भीमराव देवसरकर, संतोष गोपीसिंग घोती, संदीप गोपीसिंग घोती, राहुल प्रकाश जाधव, श्याम भुजंग दळवी, पूजा बालसिंग पडवाले, वैशाली वसंतराव देवसरकर, आकाश बालसिंग पडवाले, सतीश जगदेवराव देवसरकर यांनी अडचणींना ओलांडून एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या पैकी चौघांनी तर एमबीबीएसनंतर एमडीचेही शिक्षण पूर्ण केले. यातील सूरज, पूजा आणि आकाश यांच्या वडिलांकडे पोटापुरती शेती आहे. डॉ. अमोल देवसरकर यांच्या वडिलांचीही भिस्त शेतीवरच. संतोष आणि संदीप घोती दोघे भाऊ डॉक्टर झाले तेही घरच्या दोन एकर शेतीच्या भरवशावरच. श्याम दळवी यांच्या वडिलांची मदार उण्यापुऱ्या पाच एकर शेतीवर आहे. वैशाली देवसरकर यांच्या वडीलांकडे १० तर देवानंद देवसरकर यांच्या वडीलांडे पाच एकर शेती आहे. राहुल जाधव यांचे वडील डॉक्टर आहेत. सतीश देवसरकर यांच्या वडीलांकडे दहा एकर शेती आहे. आज अमोल वसंतराव देवसरकर (एमडी) मुंबईमध्ये, देवानंद भीमराव देवसरकर (एमडी) ठाणे येथे, राहुल जाधव (एमडी) पुणे येथे तर संतोष घोती (एमडी) नागपुरात कार्यरत आहेत.

Web Title: The doctor's village was jockeyed in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.