मेडिकलमध्ये लिपिकानेच चोरला डॉक्टरचा मोबाईल
By Admin | Updated: June 24, 2017 00:37 IST2017-06-24T00:37:30+5:302017-06-24T00:37:30+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागातील बाह्यरूग्ण तपासणी कक्षातून

मेडिकलमध्ये लिपिकानेच चोरला डॉक्टरचा मोबाईल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागातील बाह्यरूग्ण तपासणी कक्षातून वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या तपासात यात लिपिकच चोर असल्याचे निष्पन्न झाले.
राजेश रमेश हेमणे (३५) रा. शासकीय रुग्णालय वसाहत, असे त्या लिपिकाचे नाव आहे. गेल्या ६ जूनला डॉ. प्रवीण प्रजापती रूग्ण तपासणी करीत असताना दुपारी त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. प्रथम बाहेरील व्यक्तींवर संशय असल्याने अनेकांची चौकशी करण्यात आली. अखेर सायबर सेलमधून मोबाईल चोरीचा सुगावा लागला. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय श्रीकांत जिंदमवार, भीमराव शिरसाठ, गजानन डोंगरे, विशाल भगत यांनी तांत्रिक बाजूची मदत घेतली असता मोबाईल रूग्णालय परिसरातच असल्याचे आढळले. त्यांनी या परिसरात झडती घेतली. त्यात लिपिकानेच मोबाईल चोरल्याचे आढळले. सीम कार्ड का बदलले, याची विचारणा करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मोबाईल काढून दिला.