कार अपघातात डॉक्टर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:04 IST2017-12-04T22:04:15+5:302017-12-04T22:04:34+5:30
भरधाव कारचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात पुसद येथील सर्जन डॉ.राजेश वाढवे गंभीर जखमी झाले.

कार अपघातात डॉक्टर गंभीर
आॅनलाईन लोकमत
पुसद : भरधाव कारचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात पुसद येथील सर्जन डॉ.राजेश वाढवे गंभीर जखमी झाले. ही घटना पुसद ते कारला देव मार्गावर रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत डॉ.वाढवे यांना औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
डॉ.राजेश फकिरराव वाढवे हे रविवारी क्रेटा कारने (एम.एच.२९/ए.आर.-३११७) आपल्या शेताकडे जात होते. मात्र, कारला देव मार्गावरील एका नाल्याच्या वळणावर त्यांच्या कारची ओबीएस सिस्टीम (ब्रेक फेल) निकामी झाली. त्यामुळे डॉक्टरांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार तीन पलट्या खात रस्त्याच्या कडेला जावून कोसली. यात डॉ.राजेश वाढवे कारमध्ये अडकले. कारची चारही चाके वर झाल्याने त्यांना बाहेर निघणे कठीण झाले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाºयांनी हा अपघात बघितला. त्यांनी तत्काळ ओळख पटवून डॉक्टरांचे मोठे बंधू डॉ.जयानंद वाढवे यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळावर येवून डॉ.राजेश वाढवे यांना जखमी अवस्थेत प्रथम पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले.
सध्या डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे त्यांचे बंधू डॉ.जयानंद वाढवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.