तंबाखूविरोधी जागृतीसाठी धावले डॉक्टर

By Admin | Updated: June 1, 2017 00:15 IST2017-06-01T00:15:22+5:302017-06-01T00:15:22+5:30

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो.

The doctor ran for the anti-tobacco awareness | तंबाखूविरोधी जागृतीसाठी धावले डॉक्टर

तंबाखूविरोधी जागृतीसाठी धावले डॉक्टर

यवतमाळात मॅराथॉन : सर्व पॅथीच्या डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. या वर्षी आयएमए यवतमाळ शाखेसह सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले गेले. सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे सकाळी ६ वाजता सर्व पॅथीच्या डॉक्टरांसाठी तंबाखू विरोधी मॅरेथॉन अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात घेण्यात आला.
यामध्ये जवळपास दिडशे डॉक्टर सहभागी झाले होते. तीन किलोमीटर लांबच्या या स्पर्धेला जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. महात्मा फुले पुतळा, आझाद मैदान येथून ही स्पर्धा सुरु होऊन नगर परिषद, अप्सरा टॉकीज, स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफिस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन वडगाव शाखा, इंडियन होमिओपॅथिक प्रक्टिशनर्स असोसिएशन, आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ आदी संघटनांचा समावेश होता
या स्पर्धेत पुरुष गटात डॉ. निशांत चव्हाण यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. द्वितीय डॉ. ज्ञानेश्वर पुनसे तर तृतीय पुरस्कार डॉ. योगेश जेस्वानी यांनी पटकाविला. महिला गटात प्रथम डॉ. चारुता रानडे, द्वितीय डॉ. माधवी सरोळकर व तृतीय पुरस्कार डॉ. लीना मानकर यांनी पटकाविला. आॅटोचालक आणि मालवाहू गाडी चालक यांच्यासाठी डॉ. श्रीकांत मेश्राम आणि डॉ. चेतन दरणे यांचे व्याख्यान आणि मुखाची तपासणी शिबिर घेण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डेंटिस्ट असोसिएशन व तंबाखू व्यसनमुक्ती समन्वयक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यातर्फे मुखाची स्क्रीनिंग शिबिर घेण्यात आले. तंबाखू विरोधी जनजागृती फक्त एकाच दिवासापूर्ती मर्यादित न राहता हे कार्य वर्षभर सुरु ठेवणार असल्याची माहिती या प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकांत मेश्राम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी दिली.

Web Title: The doctor ran for the anti-tobacco awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.