गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका

By Admin | Updated: September 22, 2014 23:34 IST2014-09-22T23:34:52+5:302014-09-22T23:34:52+5:30

बुद्ध क्रांतिकारी होते, ते धार्मिक तर मुळीच नव्हते. बुद्धाचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका, डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीचे बोट धरून जीवनाची वाटचाल करा, तुमच्या संघर्षाची बखर लिहून काढा, तरच पुढच्या

Do not invent the religion of Gautam Buddha in religion | गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका

यशवंत मनोहर यांचा सत्कार : बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशनची सभा
यवतमाळ : बुद्ध क्रांतिकारी होते, ते धार्मिक तर मुळीच नव्हते. बुद्धाचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका, डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीचे बोट धरून जीवनाची वाटचाल करा, तुमच्या संघर्षाची बखर लिहून काढा, तरच पुढच्या पिढ्यांना तुमचा संघर्ष कळेल. डॉ.बाबासाहेबांना डोक्यावर घेवून नाचू नका तर डोक्यात घ्या, असे विचार आंबेडकरी विचारवंत व ज्येष्ठ कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी मांडले.
दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशनच्या शनिवारी आयोजित सभेनंतर जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी व्ही.पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. असोसिएशन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटनेतर्फे डॉ.मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सन्मानपत्राचे लेखन व वाचन डॉ.सागर जाधव यांनी केले.
असोसिएशनचे सचिव रवींद्र टेंभुर्णे, उपाध्यक्ष के.पी. कांबळे, एस.एल. वनकर, सहसचिव रामदास नाईक, कोषाध्यक्ष ए.जी. कांबळे, बी.ए. पाढेन, सुगंधाताई मस्के, प्राध्यापक संघटनेचे प्रा.अरुण फुलझेले, प्रा.डॉ.अशोक कांबळे, प्रा.डॉ.सागर जाधव, प्रा.प्रवीण इंगळे, प्रा.डॉ.भीमराव ठोंबरे, अ‍ॅड.सोपानराव कांबळे, अ‍ॅड.गोविंद बनसोड, योगानंद टेंभुर्णे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रा.डॉ.सागर जाधव, प्रा.डॉ.सुनंदा वालदे, प्रा.डॉ.चंद्रकांत सरदार, प्रा.डॉ.रमेश खंडारे, डॉ.सुदर्शन कांबळे, अ‍ॅड.अरुण मोहोड, घाटंजीच्या नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. क़वि. नगराळे यांच्यासह इतर चार पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमासाठी के.टी. भगत, तुकाराम मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Do not invent the religion of Gautam Buddha in religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.