शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

धीर सोडू नका, मी शासनाशी बोलतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:14 PM

बीटीने काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी नुकसान केले. बियाण्यांची योग्य पडताळणी न केल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली.

ठळक मुद्देशरद पवार : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

किशोर वंजारी / आकाश कापसे।लोकमत न्यूज नेटवर्कनेर /मांगलादेवी : बीटीने काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी नुकसान केले. बियाण्यांची योग्य पडताळणी न केल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. सुरुवातीला अळ्यांना बीटी खायची, पण आता अळीच बीटी खातेय. काही झाले तरी धीर सोडू नका. आत्महत्या करू नका. मी केंद्र व राज्य शासनाला तुमची परिस्थिती सांगतो. शेतकºयांना निश्चितच आर्थिक मदत मिळवून देऊ, असा दिलास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांगलादेवी येथील शेतकऱ्यांना दिला.तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी रामभाऊ दहापुते यांच्या सहा एकर शेतात गुलाबी बोंडअळीचा शोध लागला. मुळात बीटी जादा उत्पादन देणारे बियाणे असताना यंदा बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने जन्म घेतला. जवळपास दोन डझन नेते अळी बघून गेल्यावर शुक्रवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांगलादेवी येथील शेतकरी श्याम मुरलीधर उघडे यांच्या शेतात पाहणी केली. यावेळी मनोज उमरतकर, सागर लोंखडे, रामभाऊ दहापुते या शेतकऱ्यांनी गुलाबी अळीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पवार यांना सांगितले. फवारणी करताना शेतकरी मेला, तर शासन दोन लाखांची मदत करते. मात्र आमची अवस्था दयनीय असूनही शासनाने मदत न दिल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. गुलाबी अळीने सहा एकरातील कपाशीने दगा दिल्यामुळे मरणाची वेळ आली. मेल्याशिवाय शासन मदत करत नाही, अशी व्यथा रामभाऊ दहापुते यांनी मांडली.या शेतकºयांना दिलासा देताना शरद पवार म्हणाले, शेतकरी संकटांशी झुंज देत आहे. शासनाने बोगस बियाण्याची चौकशी करावी. बियाणे तपासताना काय चूक झाली, याची चौकशी केली पाहिजे. राज्य शासनाने त्वरित पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व जिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाला लवकर माहिती द्यावी. शासनाने हमीभाव आणि जमिनीची उत्पादनक्षमता लक्षात घेऊन मदत जाहीर करावी. यासाठी केंद्र व राज्य शासनाशी मी बोलेल, असे आश्वासन पवार यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री अनिल देशमुख, वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुफाटे, बांधकाम सभापती निमिष मानकर, राजू पाटील, उत्तमराव शेळके आदी उपस्थित होते. सुभाष भोयर, सुनील खाडे, युवराज अर्मळ, पिंटू पाटील खोडे यांसह राँका कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शेतमालाच्या भावाबाबत शासनाला प्रश्न विचाराकापूस-सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे, याबाबत एका युवा शेतकऱ्याने विचारले असता, शरद पवार म्हणाले, ज्यांना तुम्ही मतदान केले त्यांना विचारा असा टोला लगावला. बळीराजाप्रती आपुलकीने मी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझे ऐकतात असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे. मी शेतकरी बांधवांत राजकारण करत नसल्याचेही पवार म्हणाले .काँग्रेसचे निवेदनमांगलादेवी येथे शेताची पाहणी करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे पंजाबराव खोडके, राजेंद्र माहुरे, अनिल पाटील जवळगावकर, बाशिद खान, विलास बोनकीले आदींनी शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले.मेल्याशिवाय शासन मदत देत नाही!मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात डझनभर नेत्यांनी भेट दिली. पण सांत्वनाशिवाय काहीच मिळाले नाही. शेवटी त्यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरवला. शुक्रवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शेतात आल्यावर, शासन मेल्याशिवाय मदत करत नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. दहापुते यांच्यावर युनियन बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे. ते फेडावे कसे, ही विवंचना असताना त्यांनी शेतावर नांगर फिरवला.