शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दिवाळीची सुटी, एसटीची बुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:24 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देसव्वालाख प्रवाशांचे प्रचंड हाल : खासगी वाहतूकदारांकडून खुलेआम लूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत प्रवास करावा लागला.महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. या संपामुळे जिल्ह्यातील नऊ आगारातील ४९० बसेसची चाके मंगळवारी थांबली. परिणामी जवळपास दीड लाख किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. दिवाळीनिमित्त गावी जाणारे सव्वा लाख प्रवासी विविध बसस्थानकांत अडकून पडले. त्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेत प्रवास करावा लागला. अनेकांना संपाची कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले.संपामुळे जिल्ह्यात महामंडळाचे जवळपास ३७ लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. जिल्ह्यात ७५० बसफेºया रद्द झाल्या. त्याचा फटका हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. जागोजागी प्रवासी अडकून पडले. त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. बालके आणि वृद्धांना या वाहनांमध्ये अक्षरश: जनावरांप्रमाणे कोंबण्यात आले. त्यांना वाहनात कोंबून खासगी प्रवासी वाहतुकदारांनी मंगळवारी लाखोंची माया गोळा केली. मात्र बालके आणि वृद्धांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.या संपाचे नेतृत्व महाराष्ट्र मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय जिरापुरे, विभागीय सचिव स्वप्नील तगडपल्लेवार, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष राहुल धार्मिक, एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, इंटकचे अध्यक्ष सतीश डाखोरे, इंटकचे विभागीय सचिव पंजाब ताटेवार, संघर्ष ग्रुपचे सचिन गिरी, भास्कर भानारकर, रतन पवार, डी.के.भगत, विलास झेंडे आदींनी केले.शासन स्तरावर एसटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी अनेकदा कर्मचारी संघटनांनी आंदोलने केली. नंतर एसटी प्रशासनाला संपाचा इशाराही देण्यात आला होता. तरीही प्रशासन व शासनाने कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. यवतमाळ विभागातील सर्व आगारातील जवळपास अडीच हजारांच्यावर कर्मचारी या संपात उतरले आहे.‘खासगी’ची मात्र दिवाळीसंपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. या वाहतुकदारांनी संधीचे सोने करीत दरवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले. संपाचा लाभ घेत जादा पैसा कमविण्याच्या हेतूने त्यांनी प्रवाशांची कोंडी करून आपली दिवाळी खºया अर्थाने साजरी केली. मात्र खासगी वाहतूक व्यवस्थाही अपुरी पडल्याने अनेक प्रवाशांनी मंगळवारी प्रवास रद्द केला.ट्रॅव्हल्स चालकांकडून पुणेरी प्रवाशांची लूटसंपाचा लाभ घेत टॅव्हल्स चालकांनीही प्रवाशांची लूट केली. एसटी महामंडळाचे तिकीटाचे दर सामान्य प्रवाशाच्या आवाक्यात असतात. त्या तुलनेत टॅव्हल्सचे दर जादा असतात. संपाचा लाभ घेत टॅव्हल्स चालकांनी हे दर तिप्पट केले. दुसरीकडे परिवहन महामंडळाने बुकींग झालेल्या प्रवाशांना पैसे परत केले. अशा प्रवाशांना टॅव्हल्सचा आसरा घ्यावा लागला. विशेषत: पुण्याहून येणाºया प्रवाशांना या तिप्पट दराचा मोठा फटका बसला.