जिल्ह्यात वर्षभरात होणार ६० सामूहिक शेततळे
By Admin | Updated: September 7, 2015 02:29 IST2015-09-07T02:29:31+5:302015-09-07T02:29:31+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात नवीन सामूहिक शेततळे ही योजना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वर्षभरात होणार ६० सामूहिक शेततळे
यवतमाळ : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात नवीन सामूहिक शेततळे ही योजना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्याकरिता ही योजना मंजूर केली आहे. त्यात जिल्ह्याच्याही समावेश असून या वर्षात एकूण ६० सामूहिक शेततळे मंजूर केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग, भाजीपाला, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, पुष्प उत्पादन लागवड केलेली असेल असे शेतकरी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची सविस्तर माहिती तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून प्राप्त करता येईल. यासाठी अर्ज कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)