शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या दोन घटनांनी हादरला जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 05:00 IST

सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुऱ्यावर एक मृतदेह आढळला. त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी मृतकाचे नाव अमर कुमार (२५), रा. औरंगाबाद, बिहार, असे असल्याचे महामार्गावरून जाणाऱ्या दुसरा ट्रकचालक वेदराम ठाकूर, रा. भिलाई, छत्तीसगड यांनी पोलिसांना सांगितले. मृत अमर कुमार याच्यासोबत वेदराम ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे पोलिसांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/उमरखेड : जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही सत्र काही केल्या कमी व्हायला तयार नाही. शनिवारी उमरखेड येथे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला दगडाने ठेचून ठार करण्यात आले. या पाठोपाठ यवतमाळ शहरातील लोहारा भागातील इंदिरानगरमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाने मायलेकावर चाकूने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सविता नरेंद्र जाधव रा. इंदिरानगर, लोहारा असे मृत महिलेचे नाव आहे. दिनेश नरेंद्र जाधव (१८) हा गंभीर जखमी आहे. इंदिरानगरमध्ये आरोपी पवन जयंत चेके रा. इचोरी हा पोहोचला. त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीवरून सविता जाधव या महिलेसोबत वाद घालणे सुरू केले. त्यानंतर संतापलेल्या पवनने धारदार चाकू काढून सवितावर सपासप वार केले. आईच्या मदतीला धावून आलेल्या दिनेश जाधव याच्यावरही पवनने चाकूने हल्ला केला. तो गंभीर जखमी झाला. सर्वांसमक्षच ही घटना घडत होती. जखमी दिनेशने लोहारा पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार अनिल घुगल यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तासाभरातच गुन्ह्यातील  आरोपी पवन जयंत चेके याला अटक केली. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात जखमी दिनेशच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रथमदर्शनी पैशाच्या देवाण-घेवाणीतून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील चिल्ली सुकळी (ज) गावाजवळ  तुळजापूर-नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मृताचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुऱ्यावर एक मृतदेह आढळला. त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी मृतकाचे नाव अमर कुमार (२५), रा. औरंगाबाद, बिहार, असे असल्याचे महामार्गावरून जाणाऱ्या दुसरा ट्रकचालक वेदराम ठाकूर, रा. भिलाई, छत्तीसगड यांनी पोलिसांना सांगितले. मृत अमर कुमार याच्यासोबत वेदराम ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे पोलिसांना सांगितले. मृतक अमर कुमार हे ट्रकमध्ये (सीजी ०७ एएक्स ३७७२) कोळसा घेऊन बिलासपूर (छत्तीसगढ) येथून परळीकडे निघाले होते. 

जिल्ह्यात १५ दिवसांतच पाच खून

- गुन्हेगारी कारवायांमुळे यवतमाळ शहरासह जिल्ह्याची कुप्रसिद्धी होत आहे. शरीर दुखापतीच्या गुन्ह्यात यवतमाळ शहर महानगरांच्याही पुढे आहे. येथे ग्रामीण व शहरी भागातील खुनाचे सत्र सातत्याने कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यापूर्वी यवतमाळातील आर्णी मार्गावर सर्वांसमक्ष दोघांना निर्दयपणे घाव घालून ठार करण्यात आले. त्यानंतर बिटरगाव पोलीस ठाण्यातील सावळेश्वर येथे पत्नी व प्रियकराने पतीचा गळा घोटला. - शनिवारी यवतमाळ शहरासह उमरखेडमध्ये खुनाच्या दोन घटना एकाच दिवशी घडल्या. खुनाच्या गुन्ह्यात आरोपी अटक होत असले तरी त्यांच्यामध्ये कायदेशीर कारवाईचा धाक दिसत नाही. 

श्वान पथक बोलाविले- यवतमाळ येथून फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञ व श्वान पथक बोलावण्यात आले आहे. मात्र मारेकरी कोण व खुनाचे कारण काय हे गूढ अजूनही कायम आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे, एपीआय संदीप गाडे, पीएसआय विनीत घाटोळ व चमू तपास करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस