जिल्हा पोलीस दलातील ११ एपीआयच्या बदल्या
By Admin | Updated: August 18, 2014 23:50 IST2014-08-18T23:50:19+5:302014-08-18T23:50:19+5:30
तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या राज्यातील २०५ बदली पात्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांची (एपीआय) यादी नुकतीच प्रसिध्द केली.

जिल्हा पोलीस दलातील ११ एपीआयच्या बदल्या
यवतमाळ : तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या राज्यातील २०५ बदली पात्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांची (एपीआय) यादी नुकतीच प्रसिध्द केली. ही यादी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाने काढली असून त्यात यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत ११ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
संजय मनोहर शिरभाते, किरण ज्ञानदेव साळवे, विजय रामकृष्ण राठोड, हिरासिंग धनूसिंंग राठोड, विश्वनाथ दिगंबर नाईकवाडे, गोपिका बाजीराव कोडापे, तेजस्विनी बाबूराव गिरसावळे, कपिल पुंजाराम शेळके, नरेश रमेश रणधिर, मंगला उध्दव वाकडे आणि नरेश महादेव पिंपळकर आदी सहायक पोलीस निरीक्षकांचा बदली यादीत समावेश आहे. विधानसभा निवडणुका मुक्त व स्वच्छ वातावरणात पार पडाव्या, यासाठी परिक्षेत्रांतर्गत या बदल्या करण्यात आल्या आहे. असे असले तरी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस वाहतूक शाखा यासह विविध साईड ब्रँचमध्ये बदली पात्र सहायक पोलीस निरीक्षकांना जैसे थे ठेवण्यात आले आहे.