जिल्हास्तरीय जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सव उत्साहात

By Admin | Updated: February 15, 2016 02:37 IST2016-02-15T02:37:36+5:302016-02-15T02:37:36+5:30

जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्यकारिणीतर्फे जिल्हास्तरीय जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम येथील भातृमंडळात घेण्यात आले.

District-level Jijau-Savitri Dasratri festival | जिल्हास्तरीय जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सव उत्साहात

जिल्हास्तरीय जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सव उत्साहात

विविध स्पर्धा : पर्यावरणाचा संदेश देत कापडी पिशव्यांचे वाटप, खेळाडू विद्यार्थिनींचा गौरव, महिलांचा सत्कार
यवतमाळ : जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्यकारिणीतर्फे जिल्हास्तरीय जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम येथील भातृमंडळात घेण्यात आले. अध्यक्षस्थानी लता खांदवे होत्या. उद्घाटन डॉ.आशाताई देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.छाया महाले, स्रेहा भुयार, पुष्पा नागपुरे, संध्या सव्वालाखे, कीर्तीमाला चौधरी, प्रभा आवारे, शोभा ठाकरे, चारूशीला देशमुख, वैशाली सवाई, सुनीता काळे, डॉ.वंदना गोल्हर, ज्योती वातीले, जिल्हाध्यक्ष विद्या खडसे, सचिव सुवर्णा ठाकरे आदी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.रमाकांत कोलते, डॉ.अशोकराव नारखेडे, डॉ.चेतन दरणे, जयंत चावरे, पुनीत मातकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विपरीत परिस्थितीला तोंड देत पुढे जाणाऱ्या इंदूताई खाडे यांचा स्वयंसिद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारी सुचेता ठाकरे व तिच्या आईचा सत्कार करण्यात आला. शुभांगी कडू यांचाही सत्कार करण्यात आला. इतर गरजू महिलांना साडी-चोळी, पातळ व इतर साहित्य देऊन गौरविण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी बौद्धिक चाचणीवर व अभिव्यक्ती सादरीकरणावर आधारित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक रश्मी कलंत्री, द्वितीय स्रेहल लांडगे, तृतीय वनीता गावंडे, चतुर्थ रूपाली वानखडे तर पाचवा क्रमांक अमृता वडेरा यांना मिळाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अर्चना कोठारी, नीलिमा मंत्री, प्रांजली ढुमे यांनी काम सांभाळले. इतर स्पर्धेत सुनीता वानखेडे, रूपाली गायकी यांना बक्षीस मिळाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंत चावरे यांचा ‘हसू व आसू’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विद्या खडसे यांनी पर्यावरणाचा संदेश देत उपस्थित महिलांना कापडी पिशवीचे वाटप केले. संचालन प्रवीण देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी अलका राऊत, पौर्णिमा साबळे, भाग्यश्री भोयर, अनिता राऊत, अनुपमा जगताप, दीपा गुघाने, लता ठाकरे, किरण कांडलकर, अर्चना गावंडे, वृषाली ठाकरे, छाया इंगळे, सुषमा बरडे, संगीता होनाडे, अनिता बरडे, वैशाली पिसाळकर, संगीता साळवे, माणिक भोयर, रंजना पाळेकर, सुनीता वानखेडे, अर्चना देशमुख, दर्शना गुघाने, नेत्रा डुबे, आशा भुमरे, अरुणा मानकर, सुजाता गुजर आदींनी पुढाकार घेतला. प्रसंगी सुनील खडसे, सुरेश राऊत, चंद्रशेखर कुडमेथे, कृष्णराव वातीले, डॉ.अशोक मेनकुदळे, योगेश धानोरकर, प्रसाद डुबे, संजय जुमळे, गुघाने यांची विशेष उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: District-level Jijau-Savitri Dasratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.