जिल्हा ग्राहक मंचचा वीज कंपनीला दणका
By Admin | Updated: April 20, 2015 00:02 IST2015-04-20T00:02:16+5:302015-04-20T00:02:16+5:30
पांढरकवडा येथील इंदिरानगरातील अर्जून गोविंदराव कुडमते (६२) यांना विद्युत कंपनीने वाजवी वीज बिलाची आकारणी करावी, ...

जिल्हा ग्राहक मंचचा वीज कंपनीला दणका
अवाजवी बिल : वृद्ध व्यक्तीला दिलासा
यवतमाळ : पांढरकवडा येथील इंदिरानगरातील अर्जून गोविंदराव कुडमते (६२) यांना विद्युत कंपनीने वाजवी वीज बिलाची आकारणी करावी, शिवाय मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रारीचा खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
अर्जून कुडमते हे बीपीएल वीज ग्राहक आहे. त्यांना विद्युत कंपनीने प्रत्यक्ष वापरापेक्षा जादा युनीटचे बिल दिले. बिलातील रकमेचा भरणा करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
मंचच्या प्रभारी अध्यक्ष अॅड. आश्लेषा दिघाडे आणि सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तिवाद झाला. यात विद्युत कंपनीने कुडमते यांना सदोष सेवा पुरविल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने कुडमते यांच्याकडून प्रत्यक्ष वापराच्या युनीटपोटीची रक्कम घ्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी दोन हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला. या प्रकरणात कुडमते यांची बाजू अॅड. हनुमंते यांनी मांडली. (वार्ताहर)