एसटी कामगारांचे जिल्हाभर धरणे
By Admin | Updated: September 29, 2015 03:52 IST2015-09-29T03:52:13+5:302015-09-29T03:52:13+5:30
कामगार करार परिपत्रकाचा होत असलेला भंग यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट

एसटी कामगारांचे जिल्हाभर धरणे
यवतमाळ : कामगार करार परिपत्रकाचा होत असलेला भंग यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे जिल्हाभर धरणे देण्यात आले. यवतमाळ आगारात बसस्थानकासमोर झालेल्या धरणे कार्यक्रमात एसटी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शिवाय विभागीय कार्यशाळा, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, नेर, पांढरकवडा, वणी आदी ठिकाणी धरणे देण्यात आले.
यवतमाळ आगारात विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, अध्यक्ष हेमराज जावडेकर, एसटी बँक संचालक बोनगिरवार, राहुल धार्मिक, मो. इस्तियाक, जगदाळे, विलास डगवार, नरेंद्र कांबळे, सै.इरफान, गडकर, गणेश पराते, केशव साळुंके, ताई कांबळे, शेंडे, उईके, सलीमभाई, शबनम आदींनी धरणे कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आयोजित धरणे कार्यक्रमात वसंत गावंडे, कापसे, भोसले, गडकर, ढोले, राज महंमद, सै.तारीक, अजय गायकवाड, मीना मराठे, हापसे, आत्राम, पांडे, चापले, शिंदे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास १४ आॅक्टोबर रोजी पुन्हा विभागीय कार्यालयासमोर धरणे दिले जातील, असा इशारा सदाशिव शिवणकर यांनी यावेळी दिला.
कामगारांना नियमबाह्य शिक्षेचे प्रकार वाढले आहे. आर्थिक प्रश्नांसह सोयी-सुविधा पुरविल्या जात नाही. रजेचे अर्ज किंवा वैद्यकीय रजा सरसकट नाकारून पिळवणूक केली जाते. बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने भविष्य निर्वाह निधी, उपदान विलंबनाने मिळत आहे. वाहनांच्या तुटवड्यामुळे बसेस वेळेवर मिळत नाही. प्रवासी नसले तरी कामगारांकडून आठ तास काम घेण्यासाठी उशिरा जाणाऱ्या बसेस रिकाम्या सोडल्या जातात. यात एसटीचे नुकसान होत आहे. या व इतर बाबींसाठी धरणे देण्यात आले. (वार्ताहर)
४नेर : स्थानिक आगारातील एसटी कामगारांनी सोमवारी धरणे दिले. नादुरुस्त बसमुळे होणारे प्रवाशांचे हाल थांबविले जावे, यासह इतर प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास देण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कामगार संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. धरणे कार्यक्रमात महाराष्ट्र कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव नितीन चव्हाण, मयूर जगताप, संदीप मुने, राजेश कारमोरे, विजय अगम, अ.बशिर खान, कोमल चव्हाण, राजू दातार, रामदास बेले, विनोद पवार, विजय रावते, उमेश लोहकर, दीपक सोनूरकर आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)