जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:47+5:30

कोरोना महामारीच्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कशा घ्याव्या याची नियमावली आयोग पुढील तीन दिवसात जारी करणार आहे. त्याच पद्धतीने सहकारातील निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घेतली जात आहे. न्यायालयाने ३१ मार्च २०२० पूर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

District Bank Election Movements | जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली

जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली

ठळक मुद्देप्राधिकरणाने माहिती मागितली : मतदारसंख्या, मतदान बुथबाबत विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या पाच महिन्यांपासून लांबणीवर पडलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या पुणे येथील सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेसंबंधी स्थानिक सहकार प्रशासनाला माहिती मागितली आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण मतदार किती, त्यांची तालुकानिहाय संख्या, त्यानुसार कुठे किती मतदान बुथ लागणार आदी मुद्यांवर ही माहिती मागितली गेली आहे. त्यानुसार १५ तालुक्यांच्या ठिकाणी एकाच मतदान बुथवर काम होणार आहे. कारण तेथील मतदारांची संख्या शंभरच्या आत आहे. तर यवतमाळ तालुक्यात ही संख्या दीडशेच्या घरात जात असल्याने येथे दोन किंवा तीन मतदान बुथ ठेवले जाण्याची शक्यता आहे. मतदानावर फोकस निर्माण केला गेल्याने प्राधिकरण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे.
कोरोना महामारीच्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कशा घ्याव्या याची नियमावली आयोग पुढील तीन दिवसात जारी करणार आहे. त्याच पद्धतीने सहकारातील निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घेतली जात आहे. न्यायालयाने ३१ मार्च २०२० पूर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ मार्चला मतदान घेतले जाणार होते. परंतु त्याच्या दोन दिवस आधीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. जिल्हा बँक निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. कोरोनामुळे निवडणुकीला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली गेली होती. मात्र त्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने बँकेची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया राबविली गेल्याचे सांगितले जाते.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेच्या मतदारसंख्या व मतदान बुथबाबत माहिती मागितली आहे. ती पाठविली जात आहे. प्राधिकरणाचा लगतच्या काळात निवडणूक घेण्याचा मानस दिसतोय.
- राजेश दाभेराव
विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) अमरावती.

Web Title: District Bank Election Movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक