दारव्हा येथे लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

By Admin | Updated: February 12, 2016 03:05 IST2016-02-12T03:05:17+5:302016-02-12T03:05:17+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ येथे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

Distribution of prize money for Sanskars of pearls in Lokava here | दारव्हा येथे लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

दारव्हा येथे लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

नगरपरिषद शाळा : श्लोक तोटे ठरला पहिल्या बक्षिसाचा मानकरी
दारव्हा : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ येथे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चिरडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष माधुरी गडपायले, शिक्षण सभापती इंगोले, नगरसेविका आशाताई डोंगरे, संगीता म्हातारमारे, गीता उरकुडे, बंडू डोंगरे, प्रकाश उरकुडे, प्रशासन अधिकारी व्यवहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गावंडे, सदस्य सखाराम चिंतकुटलावार, विजय डांगरा, मुख्याध्यापक रमेश राठोड आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये श्लोक विनोद तोटे याने प्रथम क्रमांकाचे हेलिकॉप्टर बक्षीस पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे वालकार बक्षीस तिसरीचा विद्यार्थी पार्थ ज्ञानेश्वर दुधे तर तिसऱ्या क्रमांकाचे टिफीन बॉक्स बक्षीस सहावीतील विद्यार्थिनी साक्षी शालिक खंडारे हिने पटकावले. अनुष्का शंकर सरागे, वेदांती सचिन निमकर, साक्षी सुरेश नारनवरे, ओम दीपक तरटे, गायत्री नामदेव राठोड, नंदिनी संजय सावळकर, श्रृती अरुण ठाकरे, पराग प्रवीणकुमार निनावे व धनश्री सामेश्वर पंचबुद्धे आदींनी प्रोत्साहनपर बक्षिसे पटकावली. या सर्व बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची स्तुती केली. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण होते व स्पर्धेच्या निमित्ताने जिद्द चिकाटीसोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडते. हे सर्व परीक्षेच्या काळात व भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल कोषटवार व राकेश मडावी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी केले. आभार जगताप यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका व नगरपरिषद शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Distribution of prize money for Sanskars of pearls in Lokava here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.