घाटंजीत राष्ट्रीय बंजारा टायगर्सतर्फे साहित्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST2021-05-20T04:45:27+5:302021-05-20T04:45:27+5:30
तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढत असताना शिवणीसर्कलमधील काही गावात अनेक लोक आजारी पडले. राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे ...

घाटंजीत राष्ट्रीय बंजारा टायगर्सतर्फे साहित्य वितरण
तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढत असताना शिवणीसर्कलमधील काही गावात अनेक लोक आजारी पडले. राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे यांना माहिती मिळताच त्या गावातील लोकांना लसीकरणाकरिता प्रवृत्त केले. त्यांना मास्क वाटप केले. श्रमसाफल्य संस्थेचे अध्यक्ष अमित पडलवार यांच्या सहकार्याने सर्जिकल मास्क वितरित करण्यात आले.
पोलीस पाटील राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत गरजू लोकांना साहित्य वितरण केले. गावात घरोघरी जाऊन लोकांना लसीकरण करण्याबाबत माहिती दिली. त्यांचे गैरसमज दूर केले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून देण्याची सूचना केली. काही लोकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून दिले. राजेश आडे, विजय जाधव, श्रीराम जाधव, भगवान जुमनाके, रोहित आडे, नितीन चव्हाण, चरण राठोड, दिलीप राठोड आदींनी सहकार्य केले.