शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:34 IST2017-10-09T00:34:23+5:302017-10-09T00:34:34+5:30
येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली.

शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली. ठाणे यांच्या वतीने परीसरातील कापूस उत्पादक शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप केले. तर फवारणी करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५१ हजारांची मदत देण्याचे यावेळी जाहीर केले.
या कार्यक्रमाला सहा. जिल्हाधिकारी एस.भुवनेश्वरी, उपवनसंरक्षक अभर्ना, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तहसीलदार महादेव जोरवार, कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी उपस्थित होते. यावेळी कृषी भुषण शेतकरी रामकृष्ण वांजरीकर, अरुण ठाकरे, बायर क्रॉप सायन्स ली.ठाणेचे विभागीय प्रबंधक प्रदीप गोस्वामी, प्रकाश बोलेनवार, डॉ.अनिल भोयर, डॉ.सुनील पावडे, अनिल गंधेवार, आदीवासी नेते धर्मा आत्राम, अंकीत नैताम यांनी विचार व्यक्त केले. सर्व मृतकाच्या कुटूंबाना प्रत्येकी ५१ हजाराची मदत देन्याची घोषणा कार्यक्रमाचे संयोजक नचिकेत मिलमिले यांनी यवतमाळ जिल्हा कृषी केंद्र संचालक संघाचे अध्यक्ष प्रदीप बनगीनवार यांचे सुचनेनुसार केली. यावेळी केळापूर तालुक्यात पहापळ व टेंभी येथे मृत झालेल्या विठ्ठलराव पेरकेवार व प्रदीप सोयाम यांच्या कुटुंबाना प्रत्येकी ३१ हजार रुपयाची मदत नगदी स्वरूपात देण्यात आली. यावेळी राजु कांडूरवार, सुशील कैलासवार, किशोर देशट्टीवार, आनंद चोपडा, मिथुन गंगशेट्टीवार व शेतकरी उपस्थित होते.