पांढुर्णा, कुऱ्हाड शाळेत सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:35 IST2021-07-25T04:35:00+5:302021-07-25T04:35:00+5:30

घाटंजी : मानव विकास मिशन अंतर्गत तालुक्यातील पांढुर्णा व कुऱ्हाड येथील शाळेच्या पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. ...

Distribution of bicycles at Pandhurna, Ax School | पांढुर्णा, कुऱ्हाड शाळेत सायकल वाटप

पांढुर्णा, कुऱ्हाड शाळेत सायकल वाटप

घाटंजी : मानव विकास मिशन अंतर्गत तालुक्यातील पांढुर्णा व कुऱ्हाड येथील शाळेच्या पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

आठवी ते बारावीत शिकणाऱ्या आणि एक ते पाच किलाेमीटर अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सायकल दिली जाते. कुऱ्हाड येथील जिल्हा परिषद शाळेत १० सायकली, तर पांढुर्णा येथील विवेकानंद विद्यालयात १७ सायकलींचे वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी दीपिका गुल्हाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नागोराव चौधरी, केंद्रप्रमुख छाया बन्सोड, कुऱ्हाड शाळेचे मुख्याध्यापक राजू हेमके, विषय तज्ज्ञ संजय पातोडे, सम्राट खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी दीपिका गुल्हाने यांनी शाळा भेटी दरम्यान कुऱ्हाड व पांढुर्णा येथे अध्ययन, अध्यापन पध्दती, सेतू अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, दिव्यांग मुलांचे शिक्षण, वर्गवार भेट देऊन चर्चा केली. तसेच वृक्षारोपण ही करण्यात आले.

Web Title: Distribution of bicycles at Pandhurna, Ax School