शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वनमंत्री अन् कृषिमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांबू, सागवानच्या रोपांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 14:41 IST

वणी तालुक्यातील मंदर या वनविभागाच्या रोपवाटिकेत वनमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अटल आनंद घनवनचे उद्घाटन केले.

यवतमाळ: राज्यात वन महोत्सव - 2020 ला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने वनमंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वणी तालुक्यातील मंदर येथील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांबू आणि सागवानच्या रोपांचे वाटप करण्यात आले.  वणी तालुक्यातील मंदर या वनविभागाच्या रोपवाटिकेत वनमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अटल आनंद घनवनचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक के. अभर्णा, माजी आमदार विश्वास नांदेकर आदींनी वृक्षांची लागवड केली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सागवान व बांबूचे रोप वाटप करण्यात आले. यात वांजरी येथील श्रीराम परचाके, माणकी येथील रामभाऊ गाऊत्रे, निंबाळा येथील अतुल हिवरकर, पठारपूर येथील विजय गेडाम, कायर येथील कुंदन टोंगो, कविता गारगाटे,  अलका कोरवते, शांताराम बोंडले, अनिल उपरे, संदीप जुमनाके, आकाश पावले, भाविक परचाके आदींचा समावेश होता. सहाय्यक वनसंरक्षक अनंत दिघोळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, आशिष कुळसंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार  धनमाने, एस. एन. पांधरे उपस्थित होते.