तालुक्यात साडेचार कोटींचे वाटप

By Admin | Updated: May 29, 2015 00:15 IST2015-05-29T00:15:38+5:302015-05-29T00:15:38+5:30

महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील ...

Distribution of 4.5 crore crores in the taluka | तालुक्यात साडेचार कोटींचे वाटप

तालुक्यात साडेचार कोटींचे वाटप

नऊ हजार लाभार्थी : श्रावणबाळ, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजना
पुसद : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील ९ हजार ४०६ लाभार्थ्यांना ४ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
समाजातील गरीब, वृद्ध, विधवा, विकलांग, निराधार आदींना आर्थिक मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. पुसद तहसील कार्यालयाच्यावतीने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन, राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब लाभ आदी विविध योजनांतर्गत ४ कोटी ४३ लाख ७१ हजार रुपयांचे वितरण २०१४-१५ या वर्षात करण्यात आले. पुसदचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, प्रभारी उपविभागीय अधिकारी दीपककुमार मीना, तहसीलदार भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनात समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत तालुक्यात २०१४-१५ मध्ये ३ हजार ६२९ लाभार्थ्यांना १ कोटी ७५ लाख ४९ हजार २०० रुपये वार्षिक अनुदान म्हणून वाटप करण्यात आले, तर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २ हजार ६२६ लाभार्थी असून त्यांना १ कोटी ७१ लाख ८६ हजार ७०० रुपयांचे वार्षिक अनुदान वितरित करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत तालुक्यातील २ हजार ८८७ लाभार्थ्यांना ७२ लाख ७४ हजार २०० रुपयांचे वार्षिक अनुदान देण्यात आले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ तालुक्यातील ४८ विधवांना मिळाला आहे.
या अंतर्गत १ लाख ५ हजार २०० रुपयांचे वार्षिक अनुदान वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ ४९ अपंगांना मिळाला असून त्यांना १ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये एकूण १०७ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तालुक्यात अद्यापही श्रावण बाळ योजनेंतर्गत ३४५ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १०२ प्रकरणे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून मंजुरी मिळताच या लाभार्थ्यांनाही पैसे वितरित होतील, माहिती तहसीलदार भगवान कांबळे यांनी लोकमतला दिली. शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांचा लाभ समाजातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका महसूल विभाग चांगल्यारितीने कार्यरत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of 4.5 crore crores in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.