जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनाची तोडफोड
By Admin | Updated: July 28, 2014 23:45 IST2014-07-28T23:45:25+5:302014-07-28T23:45:25+5:30
दुचाकीस्वार टोळक्याने मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घालून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खासगी वाहनांवर दगडफेक करीत तोडफोड केली. शहरातील दाते कॉलेज चौक ते राणाप्रतापनगर परिसरात ही अनेक

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनाची तोडफोड
यवतमाळ : दुचाकीस्वार टोळक्याने मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घालून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खासगी वाहनांवर दगडफेक करीत तोडफोड केली. शहरातील दाते कॉलेज चौक ते राणाप्रतापनगर परिसरात ही अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा नेमका प्रकार काय आहे हे मात्र अद्यापही पुढे आले नाही.
शहरातील दाते कॉलेज चौक, प्रगती सोसायटी, महादेवनगर, राणाप्रतापनगर, सहकारनगर, कृषीनगर, सिंधी कॅम्प या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर असलेल्या दोघांनी घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करीत तोडफोड केली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या खासगी वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे त्यांना जाग आली. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर आले असता त्यांना एका दुचाकीवर दोन तरुण जाताना दिसले. या प्रकाराची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. चार्ली पथकाने रात्री शोध घेतला. मात्र सुगावा लागला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)