‘मेडिकल’च्या मदत कक्षाची तोडफोड
By Admin | Updated: December 15, 2014 23:08 IST2014-12-15T23:08:13+5:302014-12-15T23:08:13+5:30
अनोळखी वृध्दावर उपचारात हयगय होऊन मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मदत व मार्गदर्शन कक्षाची तोडफोड केली. ही घटना

‘मेडिकल’च्या मदत कक्षाची तोडफोड
उपचारात हयगय : वृध्दाच्या मृत्यूने वाढला रोष
यवतमाळ : अनोळखी वृध्दावर उपचारात हयगय होऊन मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मदत व मार्गदर्शन कक्षाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजवरून करावाई करण्यात येणार आहे.
येथील ‘मेडिकल’मध्ये रुग्णांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. येथे सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्त असते. मात्र त्यांना रुग्णाबाबत संवदेना नसल्याचे दिसून येते. कोणीच मार्गदर्शन अथवा मदत करत नाही. त्यामुळे त्याचा संताप अनावर होतो. नेमकीच अशी घटना सोमवारी सकाळी येथील अपघात कक्षात घडली. रुगण्यालय परिसरात वृध्द बेशुध्द अवस्थेत पडून होता. त्याला काही तरुणांनी रुग्णालयातील अपघात कक्षात आणले. या अनोळखी व्यक्तीवर तातडीने उपचार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र आपल्याच कक्षात बसून असलेल्या स्वयंसेवकांनी कोणतीच मदत केली नाही. दरम्यान यात काही वेळ गेला. वृध्दावर उपचाराची तयारी सुरू झाली तेव्हा त्याची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणांनी मदत व मार्गदर्शन कक्षाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्याठिाकणी काचांचा खच पडला होता. यामुळे परिसरात काही काळ तणाचाचे वातावरण निर्माण झाले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)