‘पीएसआय’तर्फे निर्धार दिनी चर्चासत्र

By Admin | Updated: December 22, 2016 00:11 IST2016-12-22T00:11:59+5:302016-12-22T00:11:59+5:30

पीपल्स सोशल इन्स्टीट्युशन (पीएसआय) या संस्थेच्यावतीने निर्धार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Discussion meeting by PSI | ‘पीएसआय’तर्फे निर्धार दिनी चर्चासत्र

‘पीएसआय’तर्फे निर्धार दिनी चर्चासत्र

यवतमाळ : पीपल्स सोशल इन्स्टीट्युशन (पीएसआय) या संस्थेच्यावतीने निर्धार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या गणवेशात सदस्यांनी पथसंचलन केले. स्थानिक बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भावे मंगल कार्यालयात संस्थेचे जिल्हा समन्वयक, प्रतिनिधींनी वर्षभरात केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. खुल्या सत्रात ‘संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीसाठी शोषितांचा खंबीर निर्धार ही काळाची गरज आहे’ या विषयावर खुले चर्चासत्र घेण्यात आले. संस्थेचे केंद्रीय समन्वयक सुधीर चालखुरे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सत्येश्वर मोरे लाभले होते. आपल्या प्रबोधनातून त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. १४ आॅक्टोबर १९५६ च्या धम्मक्रांतीने शोषित-पीडित, वंचित समाजाला संजिवनी दिली. आज काही प्रमाणात दिसत असलेली शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती धम्मक्रांतीचे फलीत होय, असे ते म्हणाले. उत्तमराव शिंगाडे (नागपूर), सुधीर चालखुरे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन डॉ. मुकेश दुपारे, सावन चालखुरे यांनी तर आभार नयन नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगिराज इंगोले, सिद्धार्थ खोब्रागडे, प्रा. प्रसन्ना भगत, राजेंद्र वनकर, दिनेश दुपारे, गोपिकाताई खोब्रागडे, जीवने, मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला मधुजी उके, राहुल घोडेस्वार, श्रीधर चालखुरे, डी.एस. सरदार, एस.टी. शेंडे, अ‍ॅड़ गायकवाड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)

 

Web Title: Discussion meeting by PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.