मुख्याध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा
By Admin | Updated: October 11, 2015 00:45 IST2015-10-11T00:45:18+5:302015-10-11T00:45:18+5:30
जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने यवतमाळ शहर आणि तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी सभा घेण्यात आली.

मुख्याध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा
यवतमाळ : जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने यवतमाळ शहर आणि तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत मुख्याध्यापकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी करावयाची तयारी आदी बाबी या सभेत मांडण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांनी यावर आपले मत मांडले.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रकाश भुमकाळे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विनोद संगीतराव, मुरलीधर धनरे, कृती समितीचे अध्यक्ष नीरज डफळे, उपक्रम समिती प्रमुख विजय विसपुते, विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग साखरकर, सचिव भुमन्ना बोमकंटीवार, जिल्हा उपाध्यक्ष नागोराव चौधरी, रवींद्र दूरशेटवार, मंगला वडदकर, संगीता डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली. शहर कार्यकारिणीत अध्यक्ष शिलाताई कोकाटे, सचिव एम.जी. धवने, सहसचिव अरविंद मांजरे, उपाध्यक्ष इमरान अहमद अब्दुर रहमान, कविता बुटे, प्रणीता देशपांडे, संगीता वेणूरकर, रहमत खान, शेखर गुल्हाने यांचा समावेश आहे.
तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी अमृत खेडकर, सचिव देवदत्त भोयर, सहसचिव सुरेंद्र शिंदे, उपाध्यक्ष ताराचंद चव्हाण, कल्पना उघडे, महिला प्रतिनिधी ममता देव, निलिमा गेडाम, किशोर चव्हाण, तालुका प्रतिनिधी प्रेमसिंग राठोड, दबीर उल्लाखान यांनी निवड झाली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. सभेला भीमराव गायकवाड, यशवंत ताजणे, कांचन देशमुख, एन.एल. आडे आदींची उपस्थिती होती. कार्यकारिणीमध्ये विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना संधी देण्यात आली आहे. (वार्ताहर)