राधिका ले-आऊटमध्ये भगवद्गीतेवर प्रवचन

By Admin | Updated: December 17, 2015 02:36 IST2015-12-17T02:36:27+5:302015-12-17T02:36:27+5:30

स्थानिक दर्डा नगर परिसरातील राधिका ले-आऊटमधील गणेश मंदिरात रशियन भक्त चरणरेणू देवीदासी (रशिया) यांचे भगवद् गीतेवर प्रवचन होत आहे.

Discourse on Bhagavad Gita in Radhika Le-out | राधिका ले-आऊटमध्ये भगवद्गीतेवर प्रवचन

राधिका ले-आऊटमध्ये भगवद्गीतेवर प्रवचन

यवतमाळ : स्थानिक दर्डा नगर परिसरातील राधिका ले-आऊटमधील गणेश मंदिरात रशियन भक्त चरणरेणू देवीदासी (रशिया) यांचे भगवद् गीतेवर प्रवचन होत आहे. १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ ते ९ या वेळात त्यांच्या प्रवचनाचा लाभ भक्तांना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) द्वारा या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचनाचा लाभ घेण्याची विनंती इस्कॉन प्रचार प्रमुख यादवदास नेवारे, यांनी केली आहे.
चरणरेणू देवीदासी यांनी वयाच्या १६ व्या वर्षी रशियन भाषेमध्ये श्रीमद् भगवद् गीतेचे वाचन केले. गीता वाचनानंतर भगवान श्रीकृष्णाच्या कार्याने प्रेरित होवून त्या भगवद् गीतेवर प्रवचन करू लागल्या. भारतीय संस्कृती महान आहे. मात्र आजची युवा पिढी विदेशी संस्कृतीच्या आहारी जात आहे. दुसरीकडे विदेशात भारतीय संस्कृती स्वीकारली जात आहे. भारतीयांनी आपलीच संस्कृती जोपासली पाहिले, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)

Web Title: Discourse on Bhagavad Gita in Radhika Le-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.