कालबद्ध पदोन्नतीपासून आरोग्य कर्मचारी वंचित
By Admin | Updated: March 19, 2015 02:02 IST2015-03-19T02:02:23+5:302015-03-19T02:02:23+5:30
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या यादीतून अनेक कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे.

कालबद्ध पदोन्नतीपासून आरोग्य कर्मचारी वंचित
यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या यादीतून अनेक कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे. आरोग्य विभागाचा हा गलथान कारभाराचा नमुना असल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा युनियनने म्हटले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात आली. दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत मात्र १२ व २४ वर्ष पूर्ण झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे नाहीत. चुकीची कालबद्ध पदोन्नती का करण्यात आली, असा प्रश्न युनियनने उपस्थित केला आहे.
१२ व २४ वर्षे होऊनही कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला नसलेल्या आणि आदेशात नावे नाही अशा कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी, अशी विनंती युनियनचे अध्यक्ष सुनील तलमले, सरचिटणीस विजय बुटके यांनी केली असल्याचे जिल्हा संघटक नंदकुमार गोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. (वार्ताहर)