जागेअभावी मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय

By Admin | Updated: June 18, 2014 00:25 IST2014-06-18T00:25:17+5:302014-06-18T00:25:17+5:30

सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा

Disadvantage of stamp vendors due to waking up | जागेअभावी मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय

जागेअभावी मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय

दारव्हा : सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा नसल्यामुळे त्यांना भर उन्हात उघड्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. त्यांच्याकडे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र याचा प्रचंड
त्रास सहन करावा लागत आहे.
येथील तहसिल अंतर्गत पाच दस्तलेखक व तिन मुद्रांक विक्रे ते आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परवाना असून दरवर्षी फी भरून त्याचे नूतनीकरण केल्या जाते. या सर्वांना ब्रिटीश काळापासून अधिकृत जागा देण्यात आली होती. परंतू त्या जागेवर भूमिअभिलेख कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. याच कार्यालयाखाली दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना जागा मिळू शकली असती मात्र यामुळे नोंदणी कार्यालयाचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे ही जागा नोंदणी कार्यालयाला देण्यात आली. तेव्हापासूनच बाहेर बसूनच त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
येथील दस्तलेखकांनी संबधित अधिकाऱ्याकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी केली.अमरावती विभागाचे नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बी.सी. ठाकरे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मागणी केली आहे.या दस्तलेखकांची व्यवस्था व्हावी म्हणून आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या स्थानीेक विकास निधीतून हॉलसाठी पाच लाखाचा निधी देण्याबाबतचे पत्रही दिले होते. जागाच नसल्यामुळे त्या निधीचा उपयोग होऊ शकला नाही. गेल्या दिड वर्षापासून जागेसाठी संघर्ष सुरू आहे.आता पावसाळा तोंडावर आला असतांना त्यांच्यापुढे व्यवसाय कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही जणांनी परवाना नसतांना तहसील कार्यालय परिसरात व्यवसाय थाटला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Disadvantage of stamp vendors due to waking up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.