शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दिग्रसच्या जनसंघर्ष अर्बन निधीला कुलूप; ठेवीदारांची पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:21 IST

Yavatmal : ठेवीदारांना इतर बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आमिष देऊन केले आकर्षित

लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : मागील काही दिवसांपासून जनसंघर्ष निधी अर्बनच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १० डिसेंबरपासून शाखा काही दिवस बंद असल्याचे फलक लावण्यात आले. यामुळे खातेदार चिंतेत पडले असून, ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार देणे सुरू केले आहे. पोलिसांनी या बँकेला कुलूप लावले आहे.

शहरात दोन वर्षांपूर्वी प्रणित मोरे या तरुणाने जनसंघर्ष अर्बन निधी पतसंस्था उघडली. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच सर्व कारभार सुरू ठेवला. शिवाय ठेवीदारांना इतर बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आमिष देऊन शहरासह ग्रामीण भागातील ठेवीदारांना आकर्षित केले. पतसंस्थेत व्याजाचे दर जास्त असल्याने अल्पावधीत असंख्य ठेवीदारांनी कोट्यवधींची आर्थिक गुंतवणूक केली. या जनसंघर्ष अर्बन निधीने जवळपास ३५ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्राथिमक अंदाज आहे. या बँकेच्या २ हजार ३२७ ठेवीदारांची आणि ५ हजार ६२२ खातेदारांची फसवणूक या बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने केली आहे. अनेक तालुक्यांत जनसंघर्ष अर्बन निधीने आपला विस्तार केला. यातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली. जनसामान्यांच्या मनात पतसंस्थेबाबत एका वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी १० टक्के निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यात आला. मात्र, मागील काही दिवसांपासून खातेदारांच्या ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही ठेवींचे विड्रॉल दिले नाही. यामुळे जनसंघर्ष निधी अर्बनमध्ये ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी पतसंस्थेसमोर गर्दी केली. परंतु, पतसंस्था कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अफवांना पेव फुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी दिग्रस पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर अनेकांनी पोलिस ठाणे गाठून बँकेचे अध्यक्ष आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारींची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

"जनसंघर्ष निधी अर्बन शाखेत किती रुपयांची अफरातफर झाली याचा पुरावा नाही. ठेवीदारांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात येत आहे. तक्रारी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल." - सेवानंद वानखडे पोलिस निरीक्षक, दिग्रस

टॅग्स :bankबँकdigras-acदिग्रसYavatmalयवतमाळ