शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लाईफ जॅकेट खरेदीत ‘डीआयजीं’ची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 05:32 IST

महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या जॅकेटची मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने पोलखोल केली.

- राजेश निस्तानेयवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या जॅकेटची मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने पोलखोल केली. या जॅकेट खरेदीच्या अनुषंगाने अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची विभागीय चौकशी (डीई) केली जात आहे.सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव एस. ए. बगेसवार यांच्यामार्फत ही खातेनिहाय चौकशी होत आहे. सुमारे दहा वर्षांपासून जॅकेट खरेदीचे हे प्रकरण गाजत आहे. श्रीकांत तरवडे त्यावेळी पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पदावर कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या सुरक्षा जॅकेटची ही खरेदी झाल्याची माहिती आहे. गेली काही वर्ष चौकशीची ही फाईल थंडबस्त्यात होती. परंतु अलिकडे या चौकशीने वेग घेतला आहे.२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार तर ८०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. मृतांमध्ये मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अपर पोलीस आयुक्त अशोक कामटे, एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शिंदे, एनएसजीचे कमांडो अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन, सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, एनएसजीचे जमादार गजेंद्र सिंह तसेच सीएसटीचे तीन रेल्वे कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. करकरे व कामटे यांनी सुरक्षा जॅकेट घातले असतानाही दहशतवाद्यांच्या एके-४७ मधून निघालेल्या गोळीने त्यांचा निशाणा साधला आणि तेथेच या सुरक्षा जॅकेटच्या दर्जा व गुणवत्तेची पोलखोल झाली.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र