शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

ग्रामीण तरुण जाताहेत व्यसनाच्या आहारी

By admin | Updated: December 21, 2014 23:07 IST

तंबाखु घोटून खाणे म्हणजेच ग्रामीण भागात व्यसन असा काहीसा समज काही वर्षापूर्वी होता. परंतु आधुनिकीकरणाने व्यसनांचे सर्व प्रकार आता ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. गुटखा,

पोफाळी : तंबाखु घोटून खाणे म्हणजेच ग्रामीण भागात व्यसन असा काहीसा समज काही वर्षापूर्वी होता. परंतु आधुनिकीकरणाने व्यसनांचे सर्व प्रकार आता ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. गुटखा, खर्रा येथपासून देशी-विदेशी दारु सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यसनांच्या आहारी तरुणाई जात आहे. मिसरूड न फुटलेलेही सिगरेटचे झुरके मारताना दिसून येतात. ग्रामीण भागातील तरुणाई आणि कष्टकरी असल्याचे नेहमी सांगितल्या जाते. शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन नाव कमावले आहे. परंतु आता शहरीकरणाने सर्व काही ग्रामीण भागात मिळायला लागले. पानटपऱ्या गावागावांत निर्माण झाले आहे. गुटखा, खर्रा सहज उपलब्ध होतो. एकवेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल परंतु गुटखा हवाच अशी अनेकांची अवस्था झाली आहे. आता तर धूम्रपानाकडेही तरुणांचा कल वाढत आहे. खेड्यात कधी तेंदूपत्याची विडी मिळायची त्या खेड्यात आता नामांकीत ब्रँडच्या सिगारेट मिळत आहेत. तरुणही पानटपऱ्यावर धूम्रपानाचा आनंद घेतात. धूम्रपानाबरोबरच आता ग्रामीण तरुणाई दारुच्या आहारी गेली आहे. हातभट्टीची गावठी दारु उपलब्ध असणाऱ्या गावात आता बीअर बार आणि बीअर शॉपी उघडलेल्या आहे. बदलत्या जीवनमानामुळे मद्यपान फॅशन झाले आहे. अनेक जण दारु पितात घरच्यांना हा प्रकार माहीत होतो परंतु आईवडील मुलांना परावृत्त करीत नाही. पार्टीमध्ये घेतली असे कारण सांगून त्यावर पांघरून टाकतात. मात्र जेव्हा तरुण व्यसनांमुळे हाताबाहेर जातो तेव्हा पालकांचे डोळे उघडतात नंतर मात्र कोणताही उपाय होत नाही. अनेक आजारांना आमंत्रण मिळते. दारुमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे माहीत असतानाही तरुण दारूशिवाय राहत नाही. ग्रामीण भागातील तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समुदपदेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची निर्मिती गावांमध्ये करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)