संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर भारतीयांची गरज निर्भर आहे. किंमतीने स्वस्त असलेल्या या वस्तुंच्या मोहपाशात प्रत्येकजण अडकलेला आहे. परंतु मृत्यूही ‘मेड इन चायना’ होईल, अशी कल्पनादेखील कुणी केली नव्हती. पण आता कोरोनाच्या रुपाने मृत्युही ‘मेड ईन चायना’ झाला आहे.चीनमध्ये हजारो लोकांचा बळी घेणारा ‘कोरोना’ हा आजार हळू-हळू भारतातही पसरत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वणीतही आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना विषयात वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. वणी तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन आयुर्वेदीक दवाखाने, २६ उपकेंद्र आहे. या सर्व केंद्र, उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखान्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आराग्य सहाय्यक, आशा वर्कर प्रत्येक गावात जनजागृती करीत आहे. तीव्र ताप, सर्दी खोकला व श्वास घेण्यास त्रास, अशी कोरोना आजाराची लक्षणे मानली जातात. मात्र असा एकही रुग्ण तालुक्यात आढळला नसल्याचे वणीचे तालुका वैैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.२५ किलोमीटरवर आढळला संशयित रुग्णयवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वणीपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या वरोरा येथे कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळला आहे. सदर इसम इटली येथून विमान प्रवास करीत वरोरा येथे पोहचला आहे. चंद्रपूरच्या आरोग्य यंत्रणनेने सदर व्यक्तीस आपल्या देखरेखीखाली ठेवले आहे.परदेशी पाहुण्यांवर ‘वॉच’कोरोना हा आजार केवळ चीनच नाही, तर भारतासह अनेक देशात वेगान फैैलावत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाºया व्यक्तींवर ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मरणही झाले जणू ‘मेड इन चायना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST
चीनमध्ये हजारो लोकांचा बळी घेणारा ‘कोरोना’ हा आजार हळू-हळू भारतातही पसरत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वणीतही आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना विषयात वारंवार बैठका घेतल्या जात आहेत.
मरणही झाले जणू ‘मेड इन चायना’
ठळक मुद्देवणीत ‘अलर्ट’: आरोग्य यंत्रणा लागली कामाला