शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

नवरात्रोत्सवाची धूम, उद्यापासून माॅं अंबेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तिकारांनी घाम गाळून आई दुर्गेच्या मूर्ती घडविल्या आहेत. मंगळवारी या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कलावंत मग्न झाले होते. तर मंडळांचे कार्यकर्ते आपआपल्या मंडपांचे आकर्षक देखावे खुलविण्यात दंग झाल्याचे पहायला मिळाले.  कोरोनाचे सावट काहीसे कमी झालेले असले तरी यावर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या उत्सवप्रियतेचे ज्वलंत प्रतीक असलेला दुर्गोत्सव गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आलेले मरगळ झटकून यंदा नियम पाळत हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी शहरासह जिल्हाभरातील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तिकारांनी घाम गाळून आई दुर्गेच्या मूर्ती घडविल्या आहेत. मंगळवारी या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कलावंत मग्न झाले होते. तर मंडळांचे कार्यकर्ते आपआपल्या मंडपांचे आकर्षक देखावे खुलविण्यात दंग झाल्याचे पहायला मिळाले. कोरोनाचे सावट काहीसे कमी झालेले असले तरी यावर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात १७४० मंडळांनी सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा केला होता. २०२० मध्ये ही संख्या निम्म्याहून कमी म्हणजे ५११ एवढीच होती. तर यावर्षी मंगळवारपर्यंत केवळ ११८ मंडळांनी उत्सवाची परवानगी मिळविली आहे. कोरोना नियमावलीमुळे यंदाही दुर्गोत्सव साजरा होतो की नाही, अशी भीती निर्माण झालेली असतानाच राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून मंदिर उघडण्याची परवानगी दिली. त्यासोबतच नियम पाळून सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासही मुभा दिली. परंतु यंदा राज्य शासनासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही सार्वजनिक दुर्गोत्सवात काही नियम जारी केले आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी गरबा नृत्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यासही मर्यादा घालण्यात आली आहे. तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंचीच स्थापित करता येणार आहे. मंडळांमध्ये मास्क घालून, कोविड लसीकरण झालेल्यांनाच परवानगी राहणार आहे. गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. मात्र देवीविषयीची आपली श्रद्धा जपून आणि कोरोनाची नियमावली पाळून हा उत्सव साजरा करता येणार आहे. गुरुवारपासून पुढचे नऊ दिवस जिल्हाभर नवरात्रोत्सवाची, आईच्या आरत्यांची धूम राहणार आहे.   यंदा मंडळे लसीकरण कॅम्पसह विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही सज्ज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांनी मंगळवारी नगरभवनात शांतता समितीची बैठक घेतली. 

मंगळवारपर्यंत ११८ सार्वजनिक मंडळांना परवानगी - दुर्गोत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपल्याने उत्सवाच्या परवानगीसाठी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयात धाव घेतली होती. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचाही यात समावेश होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळलाच गेला पाहिजे, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे मंडळांनी सादर केलेले कागदपत्र काळजीपूर्वक पडताळूनच परवानगी दिली जात होती. त्यामुळेच मंगळवारपर्यंत केवळ ११८ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांना परवानगी मिळाली. बुधवारी आणि गुरुवारी परवानगी प्राप्त मंडळांची संख्या वाढणार आहे. 

 

टॅग्स :Navratriनवरात्री