लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना चंद्रपूर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेश आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सहकार्याने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आणि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, पी.जी. कुळकर्णी, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, अरुण घोटेकर, भदन्त नागदीपाकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत धर्मपाल माने यांच्यासह सुखदेवराव जाधव, जयकृष्ण बोरकर यांना सन्मानित करण्यात आले.
धर्मपाल माने पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:19 IST